Photo – सिडनी कसोटीपूर्वी दोन्ही संघांची ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत ग्रेट भेट

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील चार सामने झाले असून पाचवा सामना 3 जानेवारी पासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, पाचवी कसोटी सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या सर्व खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. 

चौथा कसोटी सामना जिंकल्यामुळे सध्या ऑस्ट्रेलियाने मालिकेमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

त्यामुळे पाचवा कसोटी सामना टीम इंडियासाठी “करो या मरो”चा आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचण्यासाठी टीम इंडियाला पाचव्या कसोटी सामन्यामध्ये जिंकणे अनिवार्य आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यामुळे दुसरा कसोटी सामनाही टीम इंडिया जिंकेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत हिंदुस्थानी चाहत्यांचा हिरमोड केला आणि दुसरा कसोटी सामना जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये पावसाच्या लंपडावामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे तिसरी कसोटी अनिर्णीत राहिली. चौथ्या कसोटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 184 धावांनी पराभव केला आणि मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली.