IND vs AUS : पर्थ कसोटीत टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी उडवला धुव्वा

बॉर्डर गावस्कर करंडकातील मालिकेची टीम इंडियाची विजयी सुरुवात झालेली आहे. पर्थ कसोटीत हा ऐतिहासिक विजय झाला असून टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी धुव्वा उडवला आहे. यामध्ये यशस्वी जयस्वालने दीड शतक, विराट कोहलीने शतक तर राहुल यांचे अर्धशतक पाहायला मिळाले आहे.

इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 534 धावांचे लक्ष्य होते. ऑस्ट्रेलियन संघाचा दुसरा डाव सामन्याच्या चौथ्या दिवशी 238 धावांवरच मर्यादित राहिला. या विजयासह टीम इंडियाने कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर टीम इंडियाचा हा सर्वात मोठा विजय ठरला. सामन्यात 8 विकेट घेणारा जसप्रीत बुमराह ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला आहे.