देशातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कारची बुकिंग सुरू, एका चार्जमध्ये धावते 250km; जाणून घ्या किंमत

ऑटो एक्स्पो 2025 मध्ये अनेक इलेक्ट्रिक कार प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. अशातच एका इलेक्ट्रिक कारने त्याच्या डिझाईन आणि फीचर्सने सर्वांनाच आकर्षित केलं आहे. ही कार आहे Eva Solar Electric Car. या कारची किंमत 3.25 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 5.99 लाख रुपयांपर्यंत जाते. याच्या छतावर सोलर पॅनेल आहे, ज्याच्या मदतीने ही कार चार्ज होऊन 13-15 किलोमीटरची अतिरिक्त रेंज देते. या कारची बुकिंग सुरू झाली आहे. याच कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया…

बुकिंग सुरू

EVA सोलर इलेक्ट्रिक कारची बुकिंग सुरू झाली आहे.  ग्राहक 5000 टोकन रक्कम देऊन ही कार बुक करू शकतात. ही ऑफर पहिल्या 25,000 ग्राहकांनाच मिळेल, त्यानंतर कारची किंमत वाढण्याची शक्यता आहे.

किंमत आणि व्हॅरिएंट (बॅटरीशिवाय किंमत)

EVA Nova: 3.25 लाख रुपये
EVA Stella: 3.99 लाख रुपये
EVA Vega: 4.49 लाख रुपये

किंमत आणि व्हॅरिएंट (बॅटरीसह किंमत)

EVA Nova: 3.99 लाख रुपये
EVA Stella: 4.99 लाख रुपये
EVA Vega: 5.99 लाख रुपये

बॅटरी आणि रेंज

EVA Nova व्हॅरिएंट मध्ये 9kWh बॅटरी पॅक आहे, जो पूर्ण चार्ज केल्यावर 125km ची रेंज देईल.  याशिवाय EVA स्टेला व्हॅरिएंटमध्ये 12.6 kWh बॅटरी पॅक आहे आणि एका चार्जवर 175 किलोमीटरची रेंज देते. तसेच Vega मध्ये 18kWh चा बॅटरी पॅक आहे, जो पूर्ण चार्ज केल्यावर 250 किलोमीटरची रेंज ऑफर करतो.  यामध्ये तुम्हाला अनेक फीचर्स देखील मिळतात.  ही कार सोलर आणि इलेक्ट्रिक आहे. ही एका चार्जवर 250 किलोमीटरपर्यंतची रेंज देते, असं बोललं जात आहे.