
चित्रपट सृष्टीतील प्रत्येक कलाकाराला पद्मश्री किंवा पद्मविभूषण किताब मिळत नाही. मी उघडपणे ‘भारत माता की जय’ किंवा ‘वंदे मातरम्’ म्हणू शकतो. माझं, ‘जन गण मन’ देखील पाठ आहे. मात्र, काही कलाकारांना ‘जन गण मन’ माहीत नाही. एवढेच काय विरोधी पक्षाच्या काही नेत्यांना देखील ‘जन गन मन’ पाठ नसेल, असे वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी केले.
ज्येष्ठ उद्योजक उदयबाबू शहा यांच्या जीवन प्रवास उलगडणाऱया ‘उदयबाबू’ पुस्तकाचे प्रकाशन अनुपम खेर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सुनंदा उदयबाबू शहा, सुजय शहा, सुजाता शहा, नंदू शहा, उदन शहा आणि मोनिका शहा आदी उपस्थित होते. खेर म्हणाले, संघर्ष काळात आपला विवेक जागा ठेवून प्रत्येकाने वाटचाल केली पाहिजे. दरम्यान सुजय शहा, कन्या सुजाता, बंधू नंदू शहा आदींनी उदयबाबूंच्या आठवणींना उजाळा दिला.
अनुपम खेर म्हणाले…
ड्रामा स्कूलमधून सुवर्ण पदक मिळवूनदेखील काम मिळत नसल्याने सुरुवातीला मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
मी 37 दिवस रेल्वे स्टेशनच्या बाकावर रात्र काढली आहे.