
गद्दार गीत झोंबल्यानंतर बिथरलेल्या मिंधे गटाने कुणाल कामराचे सर्व शो हटवण्यासाठी ‘बुक माय शो’ला पत्र लिहिले आहे. ‘बुक माय शो’ने या पत्राची दखल घेत कामराच्या सर्व सामग्रीसह त्याचे नाव संकेतस्थळावरील कलाकारांच्या यादीतूनही हटवले आहे.
गद्दार गीतामुळे मिंधे गटाने स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात कुरापती सुरू केल्या आहेत. कामराच्या शोची तिकीट विक्री थांबवा अशी मागणी करत मिंधे गटाने ‘बुक माय शो’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना पत्र लिहिले. या पत्राची दखल घेत आज शनिवारी ‘बुक माय शो’ने कुणाल कामराची सर्व सामग्री हटवली त्याच बरोबर ‘बुक माय शो’च्या वेबसाईटवर असलेल्या कलाकारांच्या यादीतून त्याचे नाव हटवले.