शिवसेना माजी नगरसेवक, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस शैलेश परब यांच्या वाढदिवसानिमित्ताने जोगेश्वरी पूर्व येथे वह्या वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, उपविभाग प्रमुख पैलासनाथ पाठक, संदीप कोठारकर, महेश गवाणकर, उपविभाग समन्वयक उत्तरा नायर, शाखा संघटक रश्मी गोडांबे, योगीत पाटील, अपर्णा दातार, शाखा समन्वयक रीटा राघवा, युवासेना विभाग अधिकारी मानसी गोडांबे, कार्यालय प्रमुख राजेंद्र पवार, तुषार राणे (युवासेना), सर्व महिला, पुरुष उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, युवासेना, भारतीय विद्यार्थी सेना, व्यापार विभाग, ग्राहक संरक्षण कक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.