
‘गद्दार’ गीताद्वारे मिंधे गटाची पोलखोल करणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई उच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला. याचिकाकर्त्यांच्या अटकेशिवाय सुद्धा या प्रकरणाचा तपास सुरू राहू शकतो असे स्पष्ट करत न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने कुणाल कामरा याला अटकेपासून संरक्षण दिले.