
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला दिलासा देत मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेतून कामराने FIR रद्द करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. या सुनावणीत उच्च न्यायालयाने कुणाल कामराला 16 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 16 एप्रिलला होणार आहे.
कुणाल कामरा याला यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. यानंतर कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेतून कामराने FIR रद्द करण्याची मागणी केली. त्यावर उच्च न्यायालयाने कामराला अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच कामराने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली असून उत्तर मागितले आहे.
गद्दार गीत झोंबल्यानंतर मिंधेंकडून धमक्या, गुन्हा रद्द करण्यासाठी कुणाल कामरा हायकोर्टात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता कामराने ‘गद्दार’ गीत गायले. त्या गीतात गद्दारीसह गुवाहाटीपर्यंतचा पळ तसेच इतर गोष्टींवर बोट ठेवल्यामुळे मिंधे गट अस्वस्थ झाला. यानंतर मुंबईत खार पोलीस ठाण्यात कामराविरोधात FIR दाखल करण्यात होता. या विरोधात कामराने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणीत न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि एस. एम. मोडक यांनी राज्य सरकार आणि तक्रारदारांना नोटीस जारी केली आहे.
लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या… कुणाल कामराने शेअर केली पोस्ट