
मुंबई जिल्हा न्यायालय कर्मचारी संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धेत मुंबई उच्च न्यायालय कर्मचारी संघाने मुंबई शहर दिवाणी न्यायालय कर्मचारी संघाचा पराभव करत जेतेपद पटकावले. या स्पर्धेत शहर दिवाणी न्यायालय व सत्र न्यायालय (मुंबई), मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय (मुंबई), लघुवाद न्यायालय (मुंबई)आणि औद्योगिक व कामगार न्यायालय (मुंबई) अशा चार संघांचे बृहन्मुंबईतील आठ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचा पुरस्कार सोहळा 23 एप्रिलला मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केला जाणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती सारंग कोतवाल, न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी रवी पवार, चंद्रकांत बनकर, शरद साळवे, दिगंबर निकम हे उपस्थित होते.