मिंधे गटाचे रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला आव्हान देणारी शिवसेनेचे अमोल कीर्तिकर यांची निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. दरम्यान, या निकालाविरोधात अमोल कीर्तिकर सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.
उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत रवींद्र वायकर यांनी मतमोजणीत फेरफार करून विजय मिळवला, असा दावा करीत अमोल कीर्तिकर यांनी निवडणूक याचिका दाखल केली होती. पोस्टल मतमोजणीत 48 मतांनी वायकर विजयी झाल्याचे घोषित केले, मात्र मतमोजणी केंद्रात आमच्या प्रतिनिधींना बसू दिले नाही. केंद्रात मोबाईलचा वापर झाला. याबाबत केलेल्या तक्रारीवर 12 दिवसांत कोणतीच कारवाई केली नाही, असा दावा कीर्तिकर यांनी केला होता. याचिकेला वायकर यांनी विरोध केला होता. दोन्ही बाजू ऐकून घेत राखून ठेवलेला निकाल न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी गुरुवारी जाहिर केला.