Bomb Threat: दिल्लीतील शाळांना धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, नायब राज्यपालांनी पोलिसांना दिले निर्देश

गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीतील अनेक शाळांना ईमेलच्या माध्यमातून बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात येत आहे. यांच पार्श्वभूमीवर नायब राज्यपाल विनय सक्सेना यांनी 21 डिसेंबर रोजी बैठक घेतली. या बैठकीत शिक्षक, मुख्याध्यापक आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शाळांना सतत येणाऱ्या धमक्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शाळा आणि मुलांची सुरक्षा ही आमची प्रथम जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हंटले.

दिल्लीच्या शाळांना बॉम्बस्फोट करण्याच्या खोट्या धमक्यांबाबत घेण्यात येणाऱ्या बैठतकीत नायब राज्यपाल विनय कुमार यांनी दिल्लीतील 500 मुख्याध्यापक आणि शिक्षकांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना बॉम्बच्या खोट्या धमक्यांपासून वाचण्यासाठी शिक्षकांना तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश दिल्ली पोलिसांना दिले. तसेच अशा धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही दिल्ली पोलिसांना दिले. या संदर्भातील अहवाल 15 दिवसांत सादर करण्याचेही आदेश दिले. दिल्ली पोलिसांनी देखील सायबर धमकी आणि खोट्या बॉम्बच्या धमक्यांचा सामना करण्याबाबतची माहिती दिली.