90 च्या दशकातील बॉलीवूड अभिनेत्री त्यांच्या अभिनय, फिटनेस आणि सौंदर्यामुळे चर्चेत असतात. यापैकीच एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे तब्बू. तब्बूने केवळ अभिनयच नाही तर वयाच्या 53 व्या वर्षी तिच्या परफेक्ट फिगरने तिच्या चाहत्यांनाही वेड लावले आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या लेटेस्ट फोटोशूटमध्ये तब्बूने ब्लॅक कलरची नाईटी परिधान केली आहे. तब्बूच्या या लूकने चाहत्यांना अक्षरश: वेड लावले आहे.
तब्बूने हा लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप केला असून केस मोकळे सोडले आहेत. या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
अभिनेत्रीने हे फोटोशूट तिच्या घरातील लिव्हिंग रूममध्ये केले आहे. इंस्टाग्रामवर तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
तब्बूच्या या फोटोंवर चाहते वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. चाहत्यांनी तिच्या या लूकचे फार कौतूक केले आहे.