प्रसिद्ध गायकाने गर्लफ्रेण्ड आशना श्रॉफसोबत बांधली लग्नगाठ, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली बातमी

प्रसिद्ध गायक अरमान मलिक त्याची लॉन्ग टाईम गर्लफ्रेण्ड आशना श्रॉफ हिच्यासोबत विवाहबंधनात अडकला आहे. जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याचे अरमानने नुकतेच इंस्टावर फोटो शेअर केले आहेत, शिवाय फोटोसोबत ‘तूच माझे घर आहेस’ अशी फोटोओळही दिली आहे. अरमान पीच रंगाच्या शेरवानीत तर आशना केशरी रंगाच्या लेहेंग्यामध्ये सुंदर दिसत आहे. अरमानने गेल्या वर्षी 2024 मध्ये त्याची गर्लफ्रेंड आशना श्रॉफला लग्नाची मागणी घातली होती. त्यानंतर 23 ऑगस्ट 2024 ला या दोघांनी एकमेकांसोबत साखरपुडा केला होता आणि आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला अरमान आणि आशनाने एकमेकांसोबत लग्न केले.अरमानची बायको आशना श्रॉफ ही प्रसिद्ध यूट्यूबर आणि ब्लॉगर आहे.