Val Kilmer- ‘बॅटमॅन फाॅरएव्हर’ अभिनेत्याच्या निधनानंतर बाॅलिवुडनेही वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

बॅटमॅन फॉरएव्हर, टॉप गन आणि टॉम्बस्टोन मधील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले व्हॅल किल्मर यांचे नुकतेच लॉस एंजेलिसमध्ये वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले. त्यांची मुलगी मर्सिडीज किल्मर हिने, न्यूमोनियामुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. किल्मर अनेक वर्षांपासून घशाच्या कर्करोगाशी झुंज देत होते.

‘टॉप गन’ मधील आइसमन, ‘बॅटमॅन फॉरएव्हर’ मधील ब्रूस वेन आणि ‘टॉम्बस्टोन’मधील डॉक हॉलिडे या त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिका होत्या. 90 च्या दशकात बॅटमॅन यांनी त्या पिढीच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. म्हणून बॅटमॅनना म्हणजेच व्हॅल किल्मर यांना श्रद्धांजली देण्यासाठी बाॅलिवुडही मागे राहिले नाही.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर व्हॅल किल्मरचा एक फोटो शेअर केला. तिने फोटोसोबत फक्त लाल हृदय आणि इंद्रधनुष्य इमोजी टाकलेला होता.

 अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर व्हॅल किल्मरचा एक मोनोक्रोम फोटो शेअर केला. हॅशटॅगमध्ये लिहिले होते, “#व्हॅलकिल्मर,” त्यानंतर एक पांढरा कबुतर, हात जोडलेला आणि रडवा इमोजी ठेवला होता.

अली फजलने त्याच्या भावनिक नोटमध्ये म्हटले आहे, ” व्हॅल किल्मर तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.

व्हॅल किल्मर 1990 च्या दशकात हॉलिवूडमधील सर्वात प्रमुख आघाडीच्या नायकांपैकी एक होते. टॉप सीक्रेट! 1984, रिअल जीनियस 1985, टॉप गन1986, विलो 1988, टॉम्बस्टोन 1993, ट्रू रोमान्स 1993, हीट 1995 हे त्यांचे नावाजलेले चित्रपट आहेत.