नेटफ्लिक्सने मला फसवले, चित्रपट निर्माते वासू भगनानी यांचा गंभीर आरोप

बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते वासू भगनानी यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. भगनानी यांच्या आरोपानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नेटफ्लिक्स आणि संबंधित कंपन्यांची चौकशी सुरू केली आहे. तीन चित्रपटांच्या अधिकारांविरोधात कट रचला गेला, असे तक्रारीत म्हटले आहे. यामध्ये ‘हीरो नंबर वन’, ‘मिशन रानीगंज’ आणि ‘बडे मियां छोटे मियां’ या चित्रपटांचा समावेश आहे.

या चित्रपटांचे एसव्हीओडी अधिकार खरेदी केले आहेत. परंतु त्यांच्याकडून अद्यापपर्यंत 47.37 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली नाही, असे भगनानी यांनी म्हटले आहे. वासू भगनानी यांनी केलेले सर्व आरोप नेटफ्लिकने फेटाळून लावले आहेत. जी डील होत आहे, ती मजबूत आहे. नेटफ्लिक्सच्या टीमकडून या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.