मला लग्न करण्यात रस नाही. मला फक्त झोपण्यासाठी एक पुरुष हवाय, असं वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री तब्बूच्या नावाने गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. तब्बूला ज्यावेळी या वक्तव्याबाबत कळले त्यावेळी तिने सोशल मीडीयावर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. तब्बूच्या टीमने थेट सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अशा बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या माध्यमाला फटकारले आहे. त्यांना नैतिकतेची आठवण करून देत जाहीर माफी मागावी, अशी मागणी तब्बूकडून करण्यात आली आहे.
सोमवारी म्हणजेच 20 जानेवारी रोजी तब्बूच्या टीमने एक सार्वजनिक निवेदन जारी केले. यामध्ये तिने माध्यमांवर टीका केली आहे. एएनआयच्या वृ्त्तानुसार, त्या निवेदनात म्हटले होते की, अनेक संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडलवर तब्बूच्या नावाने चुकीचे आणि असभ्य विधान प्रकशित केले आहे. आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, अभिनेत्रीने असे काहीही सांगितलेले नाही. प्रेक्षकांची दिशाभूल केली जात असून हे नैतिकतेचे गंभीर उल्लंघन आहे. या प्रकरणी सदर मीडियाने आमची माफी मागावी आणि ते बनावट वृत्त हटवावं, असे म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी एका वेबसाइटने एक बातमी प्रकाशित केली होती. मला लग्न करण्यात रस नाही, मला फक्त झोपण्यासाठी एक पुरुष हवाय, असे वक्तव्य तब्बूने केल्याचा दावा वेबसाइटवरील वृत्तातून करण्यात आला होता. या वक्तव्याने तब्बू प्रचंड संतापली.