बोईसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि सध्या मिंधे गटाचे उमेदवार विलास तरे यांच्या कोलांटउड्यांना नागरिक आता कंटाळले आहेत. भाजपच्या तिकिटावर आमदार झालेले तरे आता अचानक मिंधे गटाचे उमेदवार झाले प्रतिसाद आहेत. त्यांच्या या जाऊन आट्यापाट्यांमुळे महायुतीमधील अनेक पदाधिकारी नाराज आहेत. त्यामुळे बोईसरमध्ये होत असलेल्या तिरंगी लढतीत शिवसेना महाविकासआघाडीचे उमेदवार डॉ. विश्वास वळवी हे बाजी मारणार आहेत.
विश्वास बळवी हे उच्चशिक्षित असून पेशाने डॉक्टर आहेत. मतदारसंघात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. याउलट विलास तरे यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात जनसंपर्क न ठेवल्यामुळे मतदारवर्ग त्यांच्यावर नाराज आहे. त्यातच ते भाजपमधून मिंधे गटाकडे आल्याने मतदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला आहे. मिंधे गटाचे कार्यकर्तेही त्यांचा पाहिजे तसा प्रचार करताना दिसत नाही. एकंदरीत महायुतीमध्ये झाल्याने त्याचा जोरदार फटका विलास तरे यांना बसणार आहे. बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांनी गेली पाच वर्षे आमदारकी उपभोगली असली तरी मतदारसंघात हवी तशी कामे न केल्याचा फटका या निवडणुकीत बसणार आहे. डॉ. विश्वास वळवी यांनी विश्वास फाऊंडेशनच्या मतदारसंघामध्ये भरीव योगदान दिले आहे. आरोग्य शिबिरे, गरजूंना मदत, शैक्षणिक मदत, दाखले वाटप अशी एक ना अनेक कामे वळवी यांच्यामार्फत करण्यात आली आहेत. गावपातळीवर त्यांनी अनेक अडचणी सोडवल्यामुळे याचाही त्यांना फायदा होणार आहे.
वळवींची प्रचारात आघाडी
विलास तरे यांची मागील लक्षात घेता तोकडा जनसंपर्क यामुळे मतदार त्यांना नापसंत करत आहेत. त्यातच मिंधे गटात उडालेले खटके व भाजपची नाराजी त्यांना पराजयाकडे नेणार आहे. राजेश पाटील यांच्यावर मतदारांनी ठेवलेला विश्वास त्यांनी तडीस नेलेला नाही. परिणामी त्यांच्या प्रचार सभांना फार कमी प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी करावे व सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी शाश्वत व आश्वासित योजना आणण्याची ग्वाही डॉ. विश्वास वळवी यांनी आहे. त्यामुळे नागरिक वळवी राहिले आहेत.
प्रश्नांची चांगली जाण असलेला माणूस
डॉ. विश्वास वळवी यांनी बोईसर विधानसभेतील गावांमध्ये चांगले काम केले आहे. सुशिक्षित असल्याने मतदारसंघामधील जनतेच्या प्रश्नांची जाण विश्वास बळवी यांना आहे. त्यांच्या विश्वास फाऊंडेशनमार्फत कोरोना काळात त्यांनी कोविड कॅम्प उभारले होते. मतदारसंघातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने लसीकरण केले होते. पाच हजारांपेक्षा जास्त महिलांचे महिला मेळावे घेऊन महिला सक्षमीकरणावर भर दिलेला आहे. मतदारसंघातील दिव्यांगांना, निराधारांना आधार देण्याचे काम त्यांनी केले आहे. आयुष्मान भारत कार्ड, ई-श्रम कार्ड असे लाखो कार्ड त्यांनी तयार करून दिले आहेत. त्यामुळे त्यांचा जनाधार मोठ्या प्रमाणात वाढला आहे.