रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बोगस फेसबुक खाते सोशल मिडीयावर असून जनतेने यापासून सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. देवेंदर सिंग आयएएस रत्नागिरी क्लेक्टोरेट (Devendra Singh IAS Ratnagiri Collectorate ) या नावाने एक बोगस फेसबुक खाते आहे. मात्र, ते रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांचे नाही. यावरुन आलेली मैत्रीची विनंती कोणीही स्वीकारु नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
या बोगस खात्यावर एका महिलेच्या छायाचित्राचा वापर करण्यात आला असून, यावर अजिबात विश्वास ठेवू नये. या खात्यावरील कोणत्याही बातमीवर किंवा कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवू नये. Collector & District Magistrate-Ratnagiri याच अधिकृत खात्यावरुन शासकीय उपक्रमांची माहिती दिली जाते. अन्य कोणत्याही प्रकारचे संदेश पाठवले जात नाहीत. कृपया, याची फेसबुक वापरकर्त्यांनी आणि नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.