संपकरी कर्मचाऱ्यांना ‘बोईंग’ने दिला झटका, कर्मचारी कपातीची केली घोषणा

एकीकडे बोईंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे, तर दुसरीकडे बोईंगच्या व्यवस्थापनाने संपकरी कर्मचाऱ्यांना मोठा झटका दिला आहे. कंपनीत लवकरच मोठी कामगार कपात केली जाणार आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत.

आर्थिक अडचणीत असल्याचा दावा करत बोईंग कंपनीने कर्मचारी कपातीचे धोरण स्वीकारले आहे. कंपनीचे चीफ फायनान्सर ऑफिसर ब्रायन वेस्ट यांनी कंपनीचे पैसे वाचण्यासाठी काही निर्णय घेत असल्याचे सांगितले.

बोईंगच्या सुमारे 33 हजार कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून आंदोलन सुरू केले आहे. कंपनीने चार वर्षांत 25 टक्के पगारवाढ होईल असे सांगितलेय, मात्र कर्मचारी युनियनने दरवर्षी 10 टक्के पगारवाढ करण्याची मागणी केलीय. कंपनी आणि युनियनमध्ये बोलणी व्हावी या दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पेन्शन आणि चांगल्या आरोग्य योजनेचीही कर्मचाऱ्यांची मागणी आहे.