
मांडवा जेटीपासून एक ते दीड किमी अंतरावर आज थरारक घटना घडली. गेट वे ऑफ इंडियाहून मांडवाच्या दिशेने 130 प्रवाशांना घेऊन निघालेल्या अजंठा कंपनीच्या फायबर बोटीला अचानक होल पडला. त्यामुळे पाणी आत शिरू लागले तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोट हेलकावे खाऊ लागली. यामुळे प्रवाशांची पाचावर धारण बसली होती. पण वेळीच मदत पोहचल्याने मोठा अनर्थ टळला. आज संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास 130 प्रवाशांना घेऊन गेट वे ऑफ इंडिया येथून मांडवीच्या दिशेने निघाली होती.