बिहारमधील कटिहारमध्ये 12 शेतकऱ्यांना घेऊन जाणारी प्रवासी बोट गंगा नदीत बुडाल्याची घटना रविवारी घडली. या दुर्घटनेनंतर काही जणांना वाचवण्यात यश आले, तर अनेक जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. स्थानिक प्रशासनाच्या पथकांसह एसडीआरएफचे पथक बेपत्ता शेतकऱ्यांचा शोध घेत आहे.
दुर्घटनेत बचावलेल्या एका पीडिताने दिलेल्या माहितीनुसार, बोटीत एक मोठा होल होता. यामुळे बोटीत पाणी शिरले आणि बोट बुडाली. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने काही लोकांना वाचवण्यात यश आले.