रात्री खड्ड्यांचा शोध घेऊन बुजवणार, पावसाळ्यात पालिका अॅक्शन मोडमध्ये

मुंबईत पावसाच्या दोन-चार जोरदार सरी कोसळल्यानंतर रस्त्यावर काही ठिकाणी पडणारे खड्डे हे वाहतूककाsंडी आणि अपघाताला कारणीभूत ठरतात. मात्र हे खड्डे आता रात्रीच बुजवण्यात येणार आहेत. त्यासाठी 227 प्रभागांत साहाय्यक रस्ते अभियंत्यांची नियुक्ती केली असून एका अभियंत्याने 10 कि.मी. परिसरातील खड्डय़ांचा शोध घेत तत्काळ बुजवण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.

मुंबईत दोन हजार 50 कि.मी. लांबीचे रस्ते मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत आहेत. यंदा मुंबईत पाणी तुंबू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली आहे. तसेच पावसाळ्यात निर्माण होणारे खड्डे बुजवण्यासाठी योग्य दक्षता घेतली आहे. खड्डय़ांच्या तक्रारीसाठी थेट हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. त्यामुळे मुंबईकरांकडून खड्डय़ांच्या तक्रारी प्राप्त होतील, त्या तक्रारींचे निवारण वेळीच करण्यात येणार आहे. मात्र मुंबईतील वाहतूक काsंडी पाहता दिवसा खड्डा शोधणे आणि बुजवणे तातडीने शक्य नाही. त्यामुळे हे काम आता साहाय्यक रस्ते अभियंत्यांच्या मदतीने रात्रीच्या वेळी सुरू आहे. एक अभियंता तीन दिवसांत 10 कि.मी. रस्त्यांवरील खड्डे शोध घेऊन बुजवण्याचे काम करणार आहे.