पावसाळी आजारांना रोखण्यासाठी पालिका सज्ज झाली असताना आता ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱया रस्त्यावरच्या अनधिकृत चायनीज, वडापाव विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे. पालिकेच्या सात परिमंडळासाठी पथक स्थापन करण्यात आले असून हे पथक आपले परिमंडळ सोडून दुसऱया परिमंडळात जाऊन कारवाई करणार आहे.
पावसाळ्यात उद्भवणाऱया मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, कावीळ, स्वाईन फ्लू या साथीच्या आजारांना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. मात्र रस्त्यावरील खाद्य पदार्थ खाल्ल्याने होणारे आजार रोखण्यासाठी आता मुंबईतील खाद्य पदार्थ विक्री करणाऱयांवर कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत कारवाई
फुटपाथ, स्थानक परिसरातील संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत मोठय़ा प्रमाणात अनधिकृत स्टॉल लावले जातात. त्यामुळे पालिकेचे पथक संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत कारवाई करणार आहे. यासाठी पालिकेच्या सात परिमंडळांत पथक स्थापन करण्यात आले आहे.