महाकाय होर्डिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मध्य आणि पश्चिम रेल्वेला फटकारले असतानाही मध्य रेल्वेने टिळकनगरमध्ये महाकाय होर्डिंगची उभारणी केली आहे. या होर्डिंगप्रकरणी मुंबई महापालिकेने मध्य रेल्वेसह हे होर्डिंग उभारणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस पाठवली आहे. मुंबईत केवळ 40 फुटांपर्यंतच जाहिरात होर्डिंग उभारले जाऊ शकते, असे धोरण असताना मध्य रेल्वेने टिळकनगर स्थानकाच्या साबळेनगर नाल्याजवळच सुमारे 80 फुटांचे होर्डिंग उभारण्यात आले आहे. या होर्डिंगला रेल्वेने परवानगी दिली आहे. त्यामुळे 40 फुटांच्या होर्डिंगच्या नियमांचे पालन करून हे काम थांबवा, अशी नोटीस मुंबई महापालिकेच्या एल विभागाच्या लायसन्स विभागाने मध्य रेल्वेसह संबंधित कंत्राटदार कंपनीला बजावली आहे.