
मुंबईतील तंदुरी पदार्थांची चव लवकरच अडचणीत येऊ शकते. याच कारण म्हणजे मुंबई महानगरपालिकेने तंदूर भट्टी वापरणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट, ढाब्यांना नोटीस पाठवली आहे. पालिकेने किचनमध्ये कोळसा भट्टी ऐवजी इलेक्ट्रिक उपकरणं किंवा सीएनजी, पीएनजी आणि एलपीजी इंधनाचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांना कोळसा भट्टीवरील तंदूर रोटी खाण्याचा आनंद आता घेता येणार नाही.
हॉटेल चालकांना 8 जुलैपर्यंत कोळसा तंदूर भट्टी इलेक्ट्रिक उपकरणांनी बदलण्याच्या सूचना पालिकेने दिली आहे. या निर्णयाचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा चालकांना दिला आहे. नोटीस बजावूनही नियम न पाळल्यास पालिका परवाना रद्द करणं, दंड आणि कायदेशीर कारवाई करू शकते.