मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने ‘मिशन अॅडमिशन’ ही विशेष मोहीम, आधुनिक, दर्जेदार, डिजिटल शिक्षणावर भर दिला असून कौशल्य विकास, स्टेम रोबोटिक्स प्रयोगशाळा, ज्ञानपेटी, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, विचारशील प्रयोगशाळा, आधुनिक पद्धतीचा अवलंब या महत्त्वाच्या तरतुदी यंदाच्या अर्थसंकल्पात केल्या आहेत.
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा 3 हजार 955.64 कोटींचा अर्थसंकल्प पालिका अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी आज पालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांना पालिका सभागृहात सादर केला. मागील वर्षी 3497.82 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यात या वर्षीच्या अर्थसंकल्पात 458 कोटींची वाढ करण्यात आली आहे. मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार व डिजिटल शिक्षण देण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. कार्यानुभव शिक्षण ऑनलाईन, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, ई-वाचनालय, डिजिटल क्लासरूम, टॅब पुरवठा, ज्ञानपेटी, विद्यार्थ्यांच्या आरोग्य साधनांवर सुधारणा असा डिजिटल शिक्षणावर भर देणारा हा अर्थसंकल्प आहे.
दिव्यांगांसाठी उपक्रम
पालिकेच्या 18 विशेष शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांकरता तपासणी व निदान केले जाईल. फिजिओ, स्पीच आणि ऑक्युपेशनल थेरपीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करून दिले जाणार आहे. शालेय इमारतीच्या संरक्षक भिंतीवर आतल्या बाजूस विद्यार्थ्यांना शैक्षणिक नैतिक मूल्य व सामाजिक जबाबदारीचे संदेश देणारे चित्रांचे रेखाटन केले जाणार आहे. त्याचबरोबर नावीन्यपूर्ण गणित व विज्ञान पेंद्र उभारली जाणार आहेत.
शिव आरोग्य सेनेच्या सरचिटणीसपदी जितेंद्र सकपाळ यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी शिवसेना सचिव विनायक राऊत, हिंदकेसरी श्रमिक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक राऊत, शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर आदी उपस्थित होते.