नाताळाच्या पहिल्या दिवशी पालिकेला 3 लाखांचा महसूल

नाताळनिमित्त शाळांना सुट्टी पडली असून सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकर पहिल्याच दिवशी घराबाहेर पडले. अनेक मुंबईकरांनी बुधवारी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला भेट देत सुट्टीचा आनंद लुटला. दिवसभर राणीच्या बागेत पर्यटकांची वर्दळ होती. बुधवारी एकूण 10 हजार 411 पर्यटकांनी उद्यानाला भेट दिली. दिवसभरात झालेल्या तिकीट विक्रीतून मुंबई महापालिकेला 3 लाख 74 हजार 150 रुपये महसूल मिळाला.