शाळा, कॉलेज परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांना पालिकेचा दणका 

शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्थांलगतच्या परिसरामध्ये विडी, सिगारेट, तंबाखू किंवा गुटखा आदी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱयांविरोधात पालिकेच्या एफ (उत्तर) विभागाच्या वतीने आज धडक कारवाई करण्यात आली. यावेळी चार दुकानांवर निष्कासनाची कारवाई करत त्यांच्याकडून एकूण 93 किलो 500 ग्रॅम तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायदा 2003 च्या कलम 4 नुसार, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य कोणत्याही शैक्षणिक संस्थांलगतच्या परिसरात विडी, सिगारेट किंवा अन्य तंबाखूजन्य उत्पादने विक्री करण्यास तसेच बाळगण्यास प्रतिबंध आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.