बेकायदा वीज घेणाऱ्या फेरीवाल्यांना पालिकेचा ‘झटका’, बेस्ट, वीज कंपन्यांकडून संयुक्त कारवाई

 मुंबईकरांना मनस्ताप ठरणाऱया बेकायदा फेरीवाल्यांवर पालिकेने जोरदार कारवाई सुरू केली असताना आता बेकायदा वीज जोडणी घेणाऱया फेरीवाल्यांवरही पालिकेने धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. पालिकेने आज बेस्ट आणि वीज कंपनीच्या सहाय्याने ही कारवाई केली. दादर, भायखळा, चेंबूर, मुलुंड, बोरिवली, अंधेरी परिसरात बेकायदा वीज जोडण्या सापडल्याने ही कारवाई करण्यात आली.

मुंबईतील बेकायदा फेरीवाल्यांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, अनधिकृत फेरीवाले, बेवारस वाहने, पदपथावरील अतिक्रमणे यावर अधिक कठोर करावी, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.