
देशात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अशातच व्हॉट्सअॅपवरून फसवणुकीची नवीन पद्धत समोर आलेय. ब्लर इमेज स्कॅम असे त्याचे नाव आहे. यामध्ये भावनांशी खेळून लोकांना फसवले जाते. एका ब्लर इमेजपासून हा स्कॅम तयार होतो. त्यामध्ये तुमचे बँक अकाऊंट रिकामे होऊ शकते किंवा तुमचा पह्न हॅक होऊ शकतो. लोकांना जाळ्यात अडकवण्यासाठी स्कॅमर व्हॉट्सअॅपवर एक ब्लर इमेज पाठवली जाते. त्यासोबत एक उत्सुकता वाढवणारा संदेश असतो. तो संदेश वाचून लोक फोटो ओपन करायला जातात. त्यानंतर तुम्ही थेट बनावट लिंकवर जाता आणि तुमची फसवणूक होते. ओटीपी, बँक डिटेल्स, पर्सनल माहिती मागवली जातात. काही वेळेला पह्नमध्ये व्हायरसदेखील येतो. स्कॅममुळे तुमच्या बँक अकाऊंटमधून पैसे जाऊ शकतात.