स्थानीय लोकाधिकार समिती व भारतीय कामगार सेना टाटा स्मारक रुग्णालय युनिटच्यावतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 19 जुलै रोजी टाटा रुग्णालयात रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबिरात तब्बल 523 पिशव्या रक्त संकलन करण्यात आले.
भारतीय कामगार सेना महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते- खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष दिलीप जाधव, टाटा स्मारक केंद्राचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, प्रशासकीय संचालक अनिल साठे, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे वामन भोसले, उल्हास बिले यांनी शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले. शिबिराच्या आयोजनात भारतीय कामगार सेना आणि स्थानीय लोकाधिकार समिती या दोन्ही युनिटचे अध्यक्ष तुकाराम गवळी, स्थानीय लोकाधिकार समितीचे युनिट सरचिटणीस नंदकिशोर कासकर, कार्याध्यक्ष ललित फोंडेकर, संतोष शिंदे, जगदीश सोळंकी, नितीन गवळी, नितीन सातपुते, सतीश पुजारी, प्रमोद गायकवाड, नीलेश गायकवाड, संदीप धामणकर, समीर चव्हाण, सदानंद चव्हाण, विजय कुलट, गणेश कांबळे, मिलिंद नाईक, रणजीत अरिहंते, सिद्धेश शिरगावकर, शैलेश लोके, महिंद्र नाकटी, पुष्पा इब्रामपूरकर, विजया माने, कलावती मकवाना आदी कार्यकर्त्यांनी हातभार लावला.