
चेंबूर-वाशी नाका येथील अष्टविनायक व सहजीवन को-ऑप. हौ.सो. वतीने लोकमान्य टिसा ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने विभागातील नागरिकांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर महायज्ञ आयोजित करण्यात आलेले होते. या शिबिरात शंभरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी विकासक संकेत जैन तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रक्तदान शिबीर यशस्वी करण्याकरिता सोसायटीतील तरुण-तरुणींनी परिश्रम घेतले, अशी माहिती गणेश गायकवाड यांनी दिली.