
जगातील सर्वात वाईट आणि कुरुप दिसणाऱ्या ब्लॉबफिश माशाला ‘फिश ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळाला आहे. गेल्या आठवडय़ात न्यूझीलंडच्या एका पर्यावरण संघटनेने ब्लॉबफिश माशाला हा पुरस्कार दिला. माऊंटेन टू सी कंजर्वेशन ट्रस्ट देशातील समुद्र आणि गोडय़ा पाण्यासंबंधी जनजागृती वाढवण्यासाठी दरवर्षी पुरस्कार देण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करते. या वर्षी ब्लॉबफिशने 5500 हून अधिक मते मिळवून जवळपास 1300 मतांनी हा पुरस्कार जिंकला आहे. ब्लॉबी मासा हा 12 इंच लांब असतो. हा मासा एक लाख अंडी देतो, असे सांगण्यात येते.