हरयाणामध्ये एका फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की त्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे हा कारखाना बेकायदेशीर होता. यात जमखी झालेल्या कामगारांची प्रकृती गंभीर आहे.
सोनीपत जिल्ह्यात वेद नावाची व्यक्ती आपल्या राहत्या घरात एक फटाक्यांचा कारखाना चालवत होता. यासाठी त्याने कुठलीही परवानगी घेतली नव्हती. या फटाक्यांमध्ये जे केमिकल वापरले जात होते, त्यात आग लागली आणि स्फोट झाला.
घटनेची महिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवली आणि सर्व रुग्णांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जी व्यक्ती हा कारखाना चालवत होता तो फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.