वक्फ कायद्याविरोधात हैदराबादमध्ये ब्लॅकआऊट

एआयएमआयएमने 30 एप्रिल रोजी ब्लॅकआऊट निषेध करण्याची घोषणा केली आहे. रात्री 9 वाजता घरातील सर्व दिवे बंद करण्यात येणार आहेत. हैदराबाद येथील एआयएमआयएमचे मुख्यालय दारुस्सलाम येथे आयोजित वक्फ वाचवा, संविधान वाचवा जाहीर सभेत ही घोषणा करण्यात आली. यावेळी काँग्रेस, भारत राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस पार्टी आणि द्रविड मुन्नेत्र कळघम यांच्यासह अनेक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.