
आरे ते कुलाबा भुयारी मेट्रो मार्गिकेच्या बीकेसी ते वरळीपर्यंतच्या दुसऱया टप्प्यातील मेट्रो सेवेचा मुहूर्त ठरेनासा झाला आहे. या मार्गावर मार्चअखेरीस प्रवासी सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले होते. ती डेडलाइन हुकल्यानंतर आता एप्रिलमध्ये प्रवासी सेवा सुरू करण्याचे ठरवले आहे. मात्र मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांमार्फत (सीएमआरएस) सुरक्षाविषयक तपासणी ‘स्लो ट्रक’वर असल्यामुळे नवीन डेडलाइनही हुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.