भाजपच्या युवा सचिवाकडे काडतुसे, पुणे विमानतळावर अटक

लोहगाव विमानतळावरून हैदराबादला निघालेल्या प्रवाशाच्या पिशवीतून 28 काडतुसे जप्त करण्यात आली होती. संबंधित प्रवाशाचे नाव दीपक काटे असून तो भाजपचा पुणे जिल्हा युवा मोर्चाचा सचिव आहे. विमानतळावरील सुरक्षा विभागाने बॅगेत काडतुसे बाळगल्याप्रकरणी त्याला पकडून पेलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी प्रवाशाला विमानतळ पोलिसांनी अटक केली. याबाबत इंडिगो एअरलाइन्सचे सुरक्षा अधिकारी प्रीती भोसले यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दीपक काटे हा मूळचा पुणे जिह्यातील इंदापूरचा रहिवाशी असून तो भाजपमध्ये सक्रिय आहे. शिवधर्म फाऊंडेशन संघटनेचा संस्थापकही आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुरलीधर मोहोळ या नेत्यांसोबत त्यांचे पह्टो आहेत.