राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांवरून जनतेच्या मनात साशंकता आहे. तसेच विरोधकांनीही ईव्हीएम आणि मतमोजणी प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ईव्हीएमच्या जीवावर जिंकलेल्या भाजपने आता खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. एसटी भाडेवाढीवरून त्यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत एसटी भाडेवाढीबाबतच्या वृत्तही दिले आहे. या पोस्टमध्ये राहित पवार यांनी म्हटले आहे की, #EVM च्या जीवावर भरघोस मतांनी जिंकलेल्या भाजपने आपले खरे रंग दाखवण्यास सुरवात केली असून #एसटी बसच्या भाड्यात 14 % दरवाढ करण्याचा निर्णय घेतला जात आहे. परिणामी एसटी बसचे 100 रुपयांचे तिकीट 114 रुपये होणार आहे. #EVM चे राक्षसी बहुमत असलेलं सरकार मागील काळात केलेल्या खर्चाची एक-एक पै सर्वसामान्य जनतेकडून वसूल करणार हे मात्र नक्की!, असे म्हणत रोहित पवार यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.
#EVM च्या जीवावर भरघोस मतांनी जिंकलेल्या भाजपने आपले खरे रंग दाखवण्यास सुरवात केली असून #एसटी बसच्या भाड्यात १४ % दरवाढ करण्याचा निर्णय घेतला जात आहे. परिणामी एसटी बसचे १०० रुपयांचे तिकीट ११४ रुपये होणार आहे. #EVM चे राक्षसी बहुमत असलेलं सरकार मागील काळात केलेल्या खर्चाची एक-एक… pic.twitter.com/ibyJ9OWpNE
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 2, 2024
अद्याप सरकार स्थापन झाले नसले तरी एसटी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता सरकारने मागील काळात केलेल्या खर्चाची एक-एक पै सर्वसामान्य जनतेकडून वसूल करणार हे मात्र नक्की, असे म्हणत रोहित पवार यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.