भाजपने दिल्लीत 48 झोपडपट्ट्या तोडण्याचा प्रयत्न केला, अरविंद केजरीवाल यांचा आरोप

जपने दिल्लीत 48 झोपडपट्ट्या तोडण्याचा प्रयत्न केला, पण त्यातल्या 37 मी वाचवल्या असे विधान आप नेते अरविंद केजरीवाल यांनी केले. तसेच भाजप नेते जे देतील ते घ्या पण दारू नका घेऊ असेही केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल म्हणाले की, भाजप नेत्यांना आता झोपडपट्ट्यांची आठवण आली. गेल्या पाच वर्षात त्यांनी किती झोपडवपट्ट्या तोडल्या हे देवालाच माहित. आज काही झोपडपट्ट्यांमध्ये भाजपचे नेते झोपायला जातात, काही महिन्यांत हेच भाजपचे नेते या झोपडपट्ट्या तोडून टाकतील. तसेच सुंदर नर्सरीच्या काही झोपडपट्ट्यांत भाजपचे नेते गेले होते आणि लहान मुलांसोबत कॅरम खेळत होते. त्यानंतर याच झोपडपट्ट्या त्यांनी तोडून टाकल्या.

गेल्या पाच वर्षांत भाजपने 48 झोपडपट्ट्या तोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यातल्या 37 मला वाचवता आल्या. आता ते शकुरबस्तीत महिलांना सलवार कमीज वाटत आहेत, ते आवर्जून घ्या. पण त्यांच्याकडून दारू घेऊ नका असे आवाहनही केजरीवाल यांनी केले.