Photo – कुर्ल्यात भाजपला धक्का! स्वप्निल येरुणकरांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपचे कुर्ला विधानसभा महामंत्री स्वप्निल चंद्रकांत येरुणकर आणि ॲड. राणी स्वप्निल येरुणकर यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यावेळी कुर्ला विधानसभा संघटक मनिष मोरजकर, माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर तसेच इतर  पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.