महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. उद्या 23 नोव्हेंबर रोजी सकाळी मतमोजणी सुरू होईल. तत्पूर्वी ईव्हीएम मशीन स्ट्राँगरुममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्ट्राँगरुमबाहेर पोलिसांसह सीआरपीएफ आणि विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचाही जागता पहारा आहे. मात्र तरीही भारतीय जनता पक्षाच्या 25-30 कार्यकर्त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास स्ट्राँगरुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार व कर्जत-जामखेडचे उमेदवार रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी शुक्रवारी सकाळी एक खळबळजनक ट्विट केले. भाजपच्या सुमारे 25-30 कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँगरुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु माझे कार्यकर्ते आणि CRPF च्या जवानांनी संयमाने परिस्थिती हाताळत हा प्रयत्न हाणून पाडल्याबाबत त्यांचे आभार!
मतदानाचा वाढलेला टक्का… महायुतीला धक्का! महाराष्ट्रात विक्रमी मतदान
याबाबत गुन्हा दाखल करताना भाजपच्या दबावाखाली असलेल्या स्थानिक पोलीस प्रशासनाने मात्र सहकार्य करण्याऐवजी त्रास देण्याचीच भूमिका घेतली, याची निवडणूक आयोगाने योग्य ती दखल घ्यावी. भाजप कार्यकर्त्यांचा हा प्रयत्न म्हणजे पराभवाच्या भितीने सुरु असलेली गुंडागर्दी आहे. पण पुढील 24 तासातच कर्जत-जामखेडच्या जनतेकडून लोकशाही मार्गाने या गुंडगिरीला चाप बसल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.
भाजपच्या सुमारे २५-३० कार्यकर्त्यांनी मध्यरात्री ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु माझे कार्यकर्ते आणि CRPF च्या जवानांनी संयमाने परिस्थिती हाताळत हा प्रयत्न हाणून पाडल्याबाबत त्यांचे आभार! याबाबत गुन्हा दाखल करताना भाजपच्या दबावाखाली असलेल्या…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 22, 2024