
स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणावणारा भाजप 32 लाख मुस्लिमांना ईदची भेट म्हणजेच ईदी देणार आहे. या भेटवस्तूंना सौगत ए मोदी असे नाव देण्यात आले आहे. नवी दिल्लीत याचा एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात भेटवस्तू म्हणजे ईदी घेण्यासाठी मुस्लिम महिलांची एकच झुंबड उडाली. कार्यक्रमातील अव्यवस्थेमुळे भआजप नेत्यांनीच या कार्यक्रमातून काढता पाय घेतला. याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
नवी दिल्लीतील सौगत ए मोदी कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाला. या कार्यक्रमात भेटवस्तू घेण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी झाली होती. तसेच भेटवस्तू घेण्यासाठी महिलांनी थेट व्यासपीठावरच धाव घेतली. त्यामुळे कार्यक्रमात मोठा गोंधळ सुरू झाला. हा गोंधळ पाहून भाजप नेतेही कार्यक्रम सोडून गेले. भाजपने ईदनिमित्त देशभरातील 32 लाख मुस्लिमांना सौगत-ए-मोदी किट देण्याची घोषणा केली आहे. ही मोहीम भाजप अल्पसंख्याक आघाडी चालवत आहे. त्यासाठी पक्षाचे 32 हजार पदाधिकारी सुमारे 32 हजार मशिदींशी संपर्क साधतील.
दिल्लीतील सौगत-ए-मोदी कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाला. या कार्यक्रमात ईदी घेण्यासाठी महिलांनी थेट स्टेजवरच धाव घेत प्रचंड गर्दी केली. स्टेजवरून वारंवार घोषणा करूनही महिलांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि गर्दी वाढतच गेली. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सौगत-ए-मोदी मोहिमेची सुरुवात करण्यासाठी, भाजप अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी आणि आघाडीचे प्रभारी आणि भाजप सरचिटणीस दुष्यंत गौतम व्यासपीठावर आले. किट्स घेण्यासाठी महिलांची इतकी मोठी गर्दी व्यासपीठावर जमली होती की प्रभारी दुष्यंत गौतम देखील कार्यक्रम सोडून निघून गेले.
भाजप सौगत-ए-मोदीला एक मोठी योजना म्हणत असताना, विरोधक त्यावर निशाणा साधत आहेत. मोदींच्या भेटवस्तूबद्दल तृणमूल काँग्रेसचे खासदार कीर्ती आझाद म्हणाले की, भाजपकडे दाखवण्यासाठी काहीही नाही. तुम्ही कधी मगरीचे तोंड पाहिले आहे का? जेव्हा तो तोंड उघडतो तेव्हा तो हसत असल्याचे दिसते, पण जर तुम्ही त्याच्या जवळ गेलात तर तो तुम्हाला गिळंकृत करेल. भाजपचीही तीच अवस्था अशीच आहे. आता मुस्लिमांना खूश करण्यासाठी त्यांनी मोदींची भेट दिली आहे. जगाला भाजपच्या कारस्थानांची जाणीव आहे. त्यांच्याकडे दाखवण्यासाठी काहीही नाही,अशी टीका त्यांनी केली आहे.