भाजपला 2023-24 या वर्षात 2 हजार 244 कोटी रुपायंची देणगी मिळाली आहे. 2022-23 च्या तुलनेत ही देणगी तिप्पट आहे. दुसरीकडे काँग्रेसला या वर्षात 288.9 कोटी रुपये देणगी मिळाली होती. 2022-23 साली काँग्रेसला 79.9 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती.
निवडणूाक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 2023-24 साली प्रुडेंट इलेक्टोरल ट्रस्टच्या माध्यमातून भाजपला 723.6 कोटी तर काँग्रेसला 156.4 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती. सर्वाधिक देणगी ही मेघा इंजिनीअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर, सीरम इन्स्टिट्यूट, आर्सेलर मित्तल ग्रुप आणि भारती एअरटेल या कंपन्यांनी दिली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत भाजपला 212 टक्क्यांनी जास्त देणगी मिळाली आहे. निवडणुकीपूर्वी भाजपला सर्वाधिक देणगी मिळणे ही नवीन बाब नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 2018-19 साली भाजपला 742 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती, तर काँग्रेसला 146.8 कोटी रुपये मिळाले होते. भाजपला इलेक्ट्रोल ट्रस्टच्या माध्यमातून 850 कोटी रुपये मिळालेत. तर 723 कोटी हे प्रुडेंट आणि 127 कोटी हे ट्रायम्फ इलेक्ट्रोल ट्रस्ट तर 17.2 लाख रुपये हे आईंझीगार्टिंग ट्रस्टमधून मिळाले आहेत.
फ्युचर गेमिंग आणि हॉटेस सर्व्हिस कंपनीने भाजपला तीन कोटी रुपयांची देणगी दिली आहे. सांटियागो मार्टिन हा फ्युचर गेमिंगचा मालक असून त्याला भारताचा लॉटरी किंगही म्हटलं जातं. या मार्टिन वर ईडीची धाड पडली असून त्याची मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशीही सुरू आहे.