भाजपचे राणा फेस्टिवल सुरू आहे काय? संजय राऊत यांचा सवाल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंड तहव्वूर राणा यांच्या प्रर्त्यापणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तहव्वूर राणाचे प्रर्त्यापण महत्त्वाचे असून भाजप या बाबीचे राजकारण करत राणा फेस्टिवल साजरा करत असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला.

मुंबई हल्लाचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा याला मुंबईत आणण्यात येत आहे, हा भाजपचा राणा फेस्टिवल सुरू आहे काय? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला. भाजप कोणत्याही गोष्टीचा फेस्टिवल करू शकतो. आता बिहार निवडणुकीपर्यंत त्यांचा राणा फेस्टिवल सुरू राहणार आहे. तब्बल 16 वर्षे अमेरिकेत न्यायालयीन लढाई सुरू होती. ही लढाई युपीए सरकारने सुरू केली होती. त्यावेळी हे फेस्टिवलवाले नव्हते.

युपीए सरकारने ही न्यायालयीन लढाई सुरू केली होती. मात्र, या गोष्टीची जाणीव यांना नाही. युपीए सरकारने त्या काळात ही लढाई सुरू केली. या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईत अमेरिकेच्या न्यायालयाने हिंदुस्थानच्या बाजून निर्णय दिला. त्यानंतर आता त्याचे प्रर्त्यापण करण्यात येत आहेत. अशा या गंभीर विषयाचाही भाजप फेस्टिवल करत आहे. पाकिस्तानच्या तुरुंगात कुलभूषण जाधव आहेत, त्यांन परत आणावेत, अशा गंभीर विषयांवर राजकाण करण्याची गरज नाही, असेही संजय राऊत यांनी भाजपला सुनावले आहे.