मुंबईत राडा, भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला; केली तोडफोड

भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात शिरुन तोडफोड केली आहे. या घटनेमुळे मुंबईतील राजकारण तापलं आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर हल्ला केल्यानंतर घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीमार केला. यानंतर आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात येत आहे.