यशाची मस्ती डोक्यात! भाजप कार्यकर्त्यांनी फोडलं काँग्रेस कार्यालय, विजय वडेट्टीवार संपातले; म्हणाले…

भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसत तोडफोड केल्याची घटना घडली आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त करत संबंधित भाजप कार्यकर्त्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेणार आहेत.

काय म्हणाले वडेट्टीवार?

विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा जो अवमानना करेल, तो कितीही मोठा असला तरी त्याविरोधात निषेध करण्याचा अधिकार लोकशाही आणि संविधानाने दिला आहे. संविधान जिवंत आहे. संविधानावर देश चालत आहे, सर्व अधिकार त्यातून प्राप्त झाले आहेत. अशातच विरोधक आंदोलन करत आहेत, म्हणून त्यांना प्रत्युत्तर देताना बाबासाहेबांच्या नावाने नारे लावत आमच्या कार्यालयावर जाऊन दगडफेक करून तोडफोड करणं, हे गुंडगिरीचं लक्षण आहे.”

वडेट्टीवार म्हणाले की, ”आपल्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी त्याला प्रत्युत्तर देण्याची तुमची धमक असेल तर तुम्ही वैचारिकदृष्ट्या द्या. तुम्ही आपले विचार मांडत लोकशाहीपद्धीतीने त्याला उत्तर डिल पाहिजे. राज्यात ज्यांचं सरकार आहे, त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी करून इतर विरोधकांची कार्यालय फोडली, तर याला काय म्हणायचं? हे संविधान मानणारे लोक आहेत का?”

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लक्ष घातलं पाहिजे’

ते पुढे म्हणाले, ”आम्हीही अनेक आंदोलनं केली, मात्र कधी कोणावर दगडफेक केली नाही. भाजपचे कार्यकर्ते असो किंवा भाजपने पाठवलेले गुंड असतो, त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक झालीच पाहिजे. या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लक्ष घातलं पाहिजे. तसं न झाल्यास चुकीचा संदेश जाईल. तुम्हाला लोकांची कार्यलय तोडण्यासाठी पाशवी बहुमत मिळालं नाही. लोकांना जाळण्यासाठी आणि त्यांना घरात घुसून मारण्यासाठी तुम्हाला बहुमत मिळालं नाही, हे समजलं पाहिजे. यशाची धुंदी आणि मस्ती डोक्यात नाही आणली पाहिजे की, लोकांची कार्यलय तोडण्यापर्यंत यांची मजल जावी.”