महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी मुलाखतकार हे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र ‘मीडिया सेल’चे अध्यक्षच असल्याची बाब आता समोर आली आहे. या मुलाखतकाराचे नाव नवनाथ बन असून ते भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र मीडिया सेलचे अध्यक्ष आहेत. आरटीआयमधून प्रश्न विचारल्यानंतर दूरदर्शनने महत्त्वाची माहिती दिली आहे. यात नवनाथ बन हे दूरदर्शनचे कर्मचारी नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
यासंदर्भात ‘द वायर’ने एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. ज्यामध्ये दूरदर्शनने ‘द वायर’ला माहितीच्या अधिकारात उत्तर दिले आहे की बन यांना त्यांच्या ‘प्रतिभा/कलाकार’ बुकिंग सिस्टमचा भाग म्हणून मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेण्याची परवानगी देण्यात आली होती – आणि त्यासाठी पैसे दिले होते’.
‘दूरदर्शनकडे टॅलेंट/कलाकार बुकिंग सिस्टम आहे जी फी रचनेनुसार विविध कलाकारांना बुक करू शकते आणि अशा प्रकारे टॅलेंट बुकिंग सिस्टमच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नवनाथ बन यांना मुलाखतीसाठी मुलाखतकार म्हणून बुक करण्यात आले होते’, असे दूरदर्शनने त्यांच्या माहिती अधिकार उत्तरांमध्ये म्हटले आहे.
5 डिसेंबर 2024 रोजी शपथ घेतल्यानंतर बन यांनी फडणवीस यांची मुलाखत घेतलेली घेतली आहे. ही मुलाखत म्हणजे नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही मीडिया प्लॅटफॉर्मला दिलेल्या पहिल्या मुलाखतींपैकी एक होती. जवळजवळ 18 मिनिटांची ही मुलाखत होती. मात्र या मुलाखतीत तटस्थपणा कुठेही दिसला नाही. उलट ही मुलाखत भाजप आणि महायुती युतीसाठी जणू प्रचारात्मक मुलाखत असल्याचे दिसून आल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
याप्रकरणी ‘द वायर’ने आरटीआय दाखल केला. 6 डिसेंबर रोजी, बन यांची फडणवीस यांनी मुलाखत घेतली ती सायंकाळी 6:30 वाजता डीडी सह्याद्री वाहिनीवर प्रसारित करण्यात आली. विशेष म्हणजे प्रसार भारती अंतर्गत दूरदर्शन कार्यालय कार्यरत आहे.
मुलाखतीनंतर काही वेळातच, ‘द वायर’ने प्रसार भारतीला आरटीआयच्या अंतर्गन विनंती दाखल केली, ज्यामध्ये विचारण्यात आले होते की, नवनाथ बन डीडी सह्याद्रीचा कर्मचारी आहे का? जर हो, तर त्याचे पद आणि इतर संबंधित तपशील काय आहेत?
जर नवनाथ बान डीडी सह्याद्रीचा कर्मचारी नसेल, तर सरकारी वाहिनीचे नियम बाहेरील व्यक्तीला मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेण्याची परवानगी देतात का? जर असेल, तर अशा व्यवस्थेचे नियम काय आहेत?
सरकारी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील या कार्यक्रमाचे मुलाखतकार नवनाथ बन होते. नवनाथ बन हे भारतीय जनता पक्षाशी (भाजप) संबंधित आहेत आणि महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राज्य मीडिया सेलचे अध्यक्ष म्हणून काम करतात.
प्रत्युत्तरादाखल, प्रसार भारतीने म्हटले की बन हे दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे कर्मचारी नाहीत.
Devendra Fadnavis’s Doordarshan Interviewer Was the Head of the BJP’s Cell. Right to Information replies by Doordarshan to The Wire say that Ban was allowed to interview the chief minister – and paid for it – as part of its “talent/artist” booking system”. https://t.co/vozKhmkI12
— Prashant Bhushan (@pbhushan1) January 13, 2025
त्यांनी म्हटले की त्यांनी त्यांच्या ‘प्रतिभा/कलाकार (sic)’ बुकिंग प्रणालीद्वारे बन यांना मुलाखतकार म्हणून बुक केले.
बन कोणत्या प्रकारचे प्रतिभासंपन्न किंवा कलाकार मानली जात होती आणि ही मुलाखत घेण्यासाठी दूरदर्शन सह्याद्री श्रेणीमध्ये कोणीही पात्र का मानले गेले नाही हे मात्र स्पष्ट झालेले नाही, असे वृत्तात म्हणण्यात आले.
महाराष्ट्रात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असंख्य प्रसिद्ध आणि कुशल पत्रकार आहेत. अशा परिस्थितीत, महत्त्वाची मुलाखत घेण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्याची निवड करणे यावर शंका उपस्थित होत होती. यात असाही प्रश्न उद्भवतो की दूरदर्शन सह्याद्रीच्या अधिकाऱ्यांना बन यांची भाजपशी असलेल्या संबंधांची माहिती होती की नाही, असेही वृत्तात म्हटले आहे
नवनाथ बन कोण आहेत?
बन यांना पत्रकारितेची पार्श्वभूमी आहे, त्यांनी एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीमध्ये सुमारे 10 वर्षे पत्रकार म्हणून काम केले आहे. 16 जानेवारी 2023 रोजी बन अधिकृतपणे भाजपच्या महाराष्ट्र मीडिया प्रमुखपदी नियुक्त झाले.
त्यांच्या प्रवेशानंतर, फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे बन यांचे अभिनंदन केले आणि पक्षात त्यांचे स्वागत केले. ते भाजपच्या कार्यक्रमांमध्ये विविध ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आणि ते फडणवीस आणि भाजप महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्तीच मानले जातात.
6 डिसेंबर रोजी बन यांनी फडणवीस यांची मुलाखत घेतली तेव्हाही ते भाजप महाराष्ट्र ‘मीडिया सेल’मध्ये होते.
बन यांनी फडणवीस यांचे कौतुक करून, विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दणदणीत यशावर प्रकाश टाकून आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करून ही मुलाखत सुरू झाली.
18 मिनिटांच्या मुलाखतीदरम्यान, बन यांनी फडणवीस यांना मुंबईच्या पायाभूत सुविधा, विकास प्रकल्प आणि शहराच्या योजनांबद्दल प्रश्न विचारले. वादग्रस्त धारावी पुनर्विकास योजनेसह वाहतूक, गृहनिर्माण आणि पुनर्विकास प्रकल्प यासारख्या विषयांवर फडणवीस यांनी चर्चा केली.
12 व्या मिनिटानंतर, मुलाखतीने राजकीय वळण घेतले. बन यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयाबद्दल प्रश्न उपस्थित केले आणि इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांना आणि मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याच्या मागण्यांना उत्तर दिले.
मात्र मुलाखतकार म्हणून बन यांनी तटस्थ भूमिका घेतल्याचं या मुलाखतीत फारसं पाहायला मिळत नसल्याचं ‘द वायर’च्या वृत्तत म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीसाठी सरकारच्या योजना, बेरोजगारी, शिक्षण विकास, युवकांच्या समस्या, महिलांची सुरक्षा आणि महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती यासारख्या मुद्द्यांना बन यांनी दूर ठेवल्याचं या वृत्तात म्हटले आहे.
मुलाखत प्रसारित झाल्यानंतर, ती विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आली.