हिंदुस्थानात पाच लाख पाकिस्तानी महिला, भाजप खासदार निशिकांत दुबे यांचा दावा

पाकिस्तानी दहशतवादाचा नवा चेहरा समोर आला असून हिंदुस्थानात जवळपास पाच लाख पाकिस्तानी महिला लग्न करून आल्याचा दावा भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी एक्सवरील पोस्टमधून केला आहे. या महिलांना आजपर्यंत हिंदुस्थानचे नागरिकत्व मिळाले नसून देशातील या शत्रूंशी लढायचे कसे? असा सवालही त्यांनी केला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या सैन्याने खासकरून हिंदूंना वेचून मारले. मोदी सरकार कुठल्याही परिस्थितीत याचा बदला घेईल. पाकिस्तानने कश्मीरचा जो भाग हिंदुस्थानकडून हिरावून घेतला आहे तो कुठल्याही परिस्थितीत घेणार, ही मोदींची गॅरंटी आहे, असेही दुबे यांनी म्हटले आहे.

मोदी की गॅरंटी… पीओके हिंदुस्थानात येणार

पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानात सामील होईल आणि पाकिस्तानचे विविध देशांमध्ये विभाजन केले जाईल, ही मोदींची गॅरंटी आहे, असे विधान भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केले आहे. झारखंडच्या देवघर येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कश्मीर आपले असून ते परत घेऊनच राहाणार. पाकिस्तानचे बलुचिस्तान, पख्तूनिस्तान आणि पंजाबमध्ये विभाजन होईल. जर असे झाले नाही तर तुम्ही बोलू शकता की, भाजपने खोटे आश्वासन दिले. ही मोदींची गॅरंटी आहे, असे दुबे म्हणाले.