
मध्य प्रदेशातील भाजप आमदार आणि माजी मंत्री उषा ठाकूर यांनी काही व्यक्ती पैसे, दारू आणि भेटवस्तू घेऊन मतदान करत असल्याचा आरोप करताना मतदारांना थेट धमकीच दिली. भाजपला मतदान न करणारे आणि लोकशाहीची तडजोड करणाऱयांना विविध प्राण्यांप्रमाणे पुनर्जन्म घ्यावा लागेल. ते पुढच्या जन्मात नक्कीच उंट, मेंढय़ा, शेळय़ा, कुत्रे आणि मांजर असतील, असा दावा त्यांनी केला. याशिवाय माझा देवाशी थेट संवाद आहे, विश्वास ठेवा, असेही त्या म्हणाल्या.