
संतोष देशमुख यांची हत्या आणि बीडमध्ये वाढत्या गुन्हेगारीसाठी मंत्री धनंजय मुंडे प्रत्येक्ष-अप्रतेक्ष जबाबदार असल्याचं आपल्या पत्रकार परिषदेत भाजप आमदार सुरेश धस अनेकवेळा म्हणाले होते. यातच मुंडे यांची भेट घेतल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर चौफेर टीका होत आहे. याचदरम्यान सुरेश धस यांनी आज पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी त्यांनी राजीनामा द्यावा, असं म्हटलं आहे.
काय म्हणाले सुरेश धस?
राजीनामा द्यायचा की, नाही हे धनंजय मुंडे यांनी ठरवावं, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. याचबद्दल धस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याचा संपूर्ण अधिकार हा अजित पवार यांना आहे. अजित पवार यांनी स्वतः सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर राजीनामा दिला होता. धनंजय मुंडे यांनीही राजीनामा दिला पाहिजे. थोड्या दिवसापुरता त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. जर संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी तुमचा संबंध आला नाही तर, तुम्ही पुन्हा मंत्रिपद स्वीकारा.”